Skip to main content

प्रतिस्पर्धी अन् मित्र


प्रतिस्पर्धी अन् मित्र

..आणि डाॅ. काशिनाथ पाहिला....
एकदम कडक सिनेमा...

सुबोध भावे म्हणजे कड्क! क्या बात है! 
सिनेमा पाहताना घाणेकरांबरोबरच नव्याने कळली ती आणखी माणसे, डाॅ.लागू आणि प्रभाकरपंत पणशीकर!

आत्मविश्वास, ताकदीचा अभिनय अन् तरीही पाय जमीनीवरच. एका लहानग्या चाहतीला आपल्या प्रतिस्पर्ध्याची सही आणून देण्यासाठी प्रचंड मोठे काळीज लागते, हिंमत लागते. फार रिअॅक्ट होता आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे अन् जिंकणे हे  येर्यागबाळ्याचे काम नोहे....

प्रभाकरपंत.... तो मी नव्हेच! इतपतच माहिती ! त्यातल्या त्यात इथे ओशाळलाचा औरंगजेब थोडाफार ओळखीचा! पण आज सिनेमा पाहिला अन् त्यांच्यातला मित्र समजला
आपल्या मित्राचा चांगला वाईट प्रत्येक गुण ओळखणारा,त्याच्यातली ताकद त्याच्यापेक्षाही अधिक माहित असलेला, त्याच्या पडत्या काळात त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा, त्यासाठी जगाशी लढणारा!
त्याच्या विक्षिप्त वागण्याला जाणून घेऊनही त्यातले चांगलेच वेचणारा! प्रसंगी त्याला खडे बोल सुनावणारा,आपल्या मित्राला अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रचंड मोठी रिस्क घेणारा! आणि इतके असुनही काशिनाथच्या यशामध्येतो मी नव्हेच!’ असे म्हणणारा हा मनस्वी कलाकार..... प्रभाकर पंत!

आणि अर्थात ह्या दोन्ही भूमिकांना न्याय देणारे आपले लाडके कलाकार... प्रसाद आणि सुमित, hats off to you too!

@अनघा पारखी



Comments

  1. Sundar,Kahi manse ashich astat niswarthi...

    ReplyDelete
  2. Part 1 एक प्रतिभावंत अभ्यासू बुद्धिमान हरहुन्नरी लाखात देखणा रॉयल टच असणारा नावीन्यपूर्ण प्रयोगशील सादरीकरणाचा ध्यास असलेला out of this world एन्ट्री असणारा नटरंग नटसम्राट ... Part 2 मनमिळाऊ मित्रांचा मित्र आणि शत्रूंचा कर्दनकाळ इतिहासप्रेमी Part 3 व्यवहार ज्ञान नसलेला उनाड बेभान बेछूट बालिश बेजबाबदार उर्मट व्यसनी रंडीबाज (पण संजुबाबा एवढा नाही) वडिलांच्या ego problem मुळे मनात ल्या मनात धुमसणारा रंगेल आणि मतलबी मित्रांचा नाद लावून घेऊन बिघडलेला Part 4 कुटुंबवत्सल प्रेम करेल तर भिल्लला सारख आणि शेवटच्या श्वासापर्येंत... ।।।।।। थोडक्यात about movie नयनरम्य अतिउत्तम सादरीकरण... कट टू कट कास्टिंग ... छान मेक अप ... उत्कृष्ट अभिनय व लोकेशन्स... एकदम कडक Tragedy ।।।।।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...