Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

प्रतिस्पर्धी अन् मित्र

प्रतिस्पर्धी अन् मित्र .. आणि डाॅ . काशिनाथ पाहिला .... एकदम कडक सिनेमा ... सुबोध भावे म्हणजे कड्क! क्या बात है!  सिनेमा पाहताना घाणेकरांबरोबरच नव्याने कळली ती आणखी २ माणसे , डाॅ . लागू आणि प्रभाकरपंत पणशीकर ! आत्मविश्वास , ताकदीचा अभिनय अन् तरीही पाय जमीनीवरच . एका लहानग्या चाहतीला आपल्या प्रतिस्पर्ध्याची सही आणून देण्यासाठी प्रचंड मोठे काळीज लागते , हिंमत लागते . फार रिअॅक्ट न होता आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे अन् जिंकणे हे     येर्यागबाळ्याचे काम नोहे .... प्रभाकरपंत .... तो मी नव्हेच ! इतपतच माहिती ! त्यातल्या त्यात इथे ओशाळलाचा औरंगजेब थोडाफार ओळखीचा ! पण आज सिनेमा पाहिला अन् त्यांच्यातला मित्र समजला .  आपल्या मित्राचा चांगला वाईट प्रत्येक गुण ओळखणारा , त्याच्यातली ताकद त्याच्यापेक्षाही अधिक माहित असलेला , त्याच्या पडत्या काळात त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा , त्यासाठी जगाशी लढणारा ! त्याच्या विक्षिप्त वागण्याला जाणून घेऊनही त्यातले चांगलेच वेचण...

Pure Non-veg ...on Chaturthi??????

Pure Non-veg........On Charurthi???????? परिक्षा सुरू झाल्या की मुलांपेक्षा आम्हा आयांचीच exam जास्त असते . उद्या हिंदीचा पेपर .. आधीच आमचा हिंदीत सगळा उजेड तरीही ‘ पोंगल ’ पाठ शिकवायला घेतला . मी : मत्तु पोंगल के दिन क्या करते है ? सजु : मत्तु पोंगल के दिन उपयोग में आनेवाले पशुओं की पुजा करते है ! मी :Very Good, example?? जुई : कोंबडी ....... मी : 😳 आॅं ( मनांत : खाण्याच्या उपयोगी प्राण्यांचा विचार करत्येय का हि ????) जुई : नाही नाही ... बदक मी : 😥😳 अगं काय ???( मनांत : हे खातात हे हिला माहित्येय ??) जुई : Sorry sorry.... कौआ , चिडीया ( मी मनांत : अगदी अफ्रिकेच्या interior भागांत जायला नको हि ) मी : 😪🤫🤫🤫🤫 अगं बाई ..... फसल के लिये उपयुक्त ... गाय , बैल ( मी पटकन उत्तर सांगून टाकले ) @ अनघा पारखी

खेळणी

खेळणी# खुप दिवसापासून ठरवत होते कि मुलींची खोली आवरायची. ते हि त्या दोघी नसताना! अहो! कित्ती तो पसारा! चिंध्यासुद्धा जपून ठेवल्या होत्या दोघींनी! काल मुली आजी आबांकडे गेलेल्या, चला,हवी तशी संधी मिळाली होती आणि वेळही होता. त्यात सई जुईंचे soft toy चे वेड! जाम राग येतो मला त्यांनी soft toy विकत घेतले तर! पण जशी मी खोली आवरली, वस्तू जागच्या जागी ठेवल्या, अनेक तुटक्या फुटक्या वस्तू टाकल्या तेव्हा एक गोड चमत्कार माझ्यापुढे होता. तो पाहून जाणवले कि मुलींना हि गोष्ट का एवढी आवडते! मी त्यांना जपून ठेवल्यामुळे मुलींच्या जन्माआधीपासून जमवलेले हे soft toys फारच प्रेमाने माझ्याकडे पहात होते.

तो आणि मी

तो आला...त्याने पाहिले.. त्याने जिंकले! अगदी असेच काहीसे झाले त्याचे अन् माझे. Arrange Marriage असून सुद्धा! सगळंच काही छान छान .. Goody Goody नव्हतं. सगळ्या नवरा- बायकोंसारखे आमचेही ‘ बोलणे कमी अन् टोमणेच जास्त’.अगदी रोजच्या रोज! मी ‘एक’ म्हटले की त्याने ‘दोन’ म्हंटलेच पाहिजे आणि त्याने ‘एक’ म्हटले की मी ‘दोन’. होते मात्र अनेकदा माझ्याच मनासारखे. अर्थात त्यालाही ते तसेच व्हावेसे वाटत असते.पण माझ्याशी वादविवाद घालून, मग माझे चिडणे..रूसणे..रडणे आणि मग त्याने हार मानल्यासारखे करुन मला समजावणे!! आम्ही स्वभावाने म्हणाल तर अगदी दोन टोकं! माझी सतत बडबड आणि हा मुलखाचा शांत, मी नाही पटले तर तोंडावर बोलणार अन् हा कोणतीच गोष्ट ओठांवर नाही आणणार, जेवणाची वेळ ५ मिनिटे जरी इकडे तिकडे झाली की ह्याची तगमग सुरु होणार अन् मला मात्र सगळ्या वेळा झुगारून द्यायलाच आवडणार, त्याला आवडणार पोळी भाजी अन् मला चटकदार चाट, चायनीज, spicy पदार्थांची मेजवानी, मी कित्येकवेळा देखाव्याला भुलणार अन् हा मात्र प्रत्येकवेळी तासून Quality पहाणार, मी अनेकदा, अनेकांकडून अपेक्षा करणार, अन् पूर्ण न झाल्यास चिडचिड करण...

प्राथमिकचा शेवटचा दिवस

आज ७ एप्रिल २०१८. बालशिक्षणचे प्राथमिकचे चौथीचे विद्यार्थी आणि पालक ‘CID’( Children’s Independence Day) आणि PID ( Parents Independence Day especially सर्व आयांचा!) साजरा करतोय. परिक्षा संपल्याचे सुख आहेच पण त्याच बरोबर आज अचानक जाणीव झाली की अरेच्चा ! संपली की Primary! तब्बल ८-९ वर्षे मुले शाळेत जात आहेत.शाळेत सोडताना आम्हाला घट्ट धरून रडणारी आमची चिमुकली आज म्हणते की आमचा friends चा plan ठरलाय आई! Please आम्हाला आता enjoy करू दे. तु नको disturb करूस किंवा तु please आता नाही म्हणू नकोस. लहान असताना शाळा सुटली की teacher च्या खांद्यावर झोपलेल्या आमच्या मुलांना आम्ही कित्येकवेळा घेतलय. ज्या निरागसतेने मुले आपल्या teachers वर विश्वास ठेवायची त्याच निरागसतेने यापुढे ठेवतील?? शिक्षक वाक्य प्रमाणम्! Teacher सांगतील ते आणि तसेच बोलायचे, लिहायचे. अगदी १% सुद्धा बदल करायचा नाही. एखादि घटना, बातमी जर आई-बाबंपेक्षा teachers नी सांगितली असेल तर ती पटणार... आपल्याला परत परत घोळवून सांगणार. आम्ही कितीही सांगितले तरी जोवर teachers त्यांवर शिक्कामोर्तब करत नाहीत तोवर regular dry fruits देखील...

Mother’s Day!

Mother’s Day आज सकाळी उठल्यापासून मोबाईल महाराज खणखणू लागले. सर्वदूरुन एकच मेसेज. ‘Happy Mother’s Day’ अरेच्चा! हो की! मग एक आई असल्याने मलाही फार Great वगैरे असल्यासारखे वाटायला लागले. मी पण मग जगरहाटीला धरून WhatsApp चा DP बदलला... म्हटलं आपल्याला काहीच माहीत नसते हे फार कोणाला कळायला नको. आपणही कसे updated असतो हे कळेल इतरांना! ‘झाकली मुठ ....’ आई.... फार मोठा शब्द आहे. फ.मुंची कविता आठवली आत्ता आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं आई खरंच काय असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही अन् उरतही नाही इतकं सगळं आहे आई म्हणजे... जे Mother ह्या शब्दात मावत नाही.. ती जे काही करते , ते असं शब्दात मांडताच येत नाही. पण माझ्यासाठी माझी जन्मदात्री आई म्हणजेच सर्व का?? आजपर्यंत मला आई किती ठिकाणी भेटलीय! माझी आई.. मला हजार कळा सोसून जन्म देणारी, मला न्हाऊ-माखु घालणारी, मला चांगल्या सवयी लावणारी, भूक लागलेली असताना ‘थांब गं! उगीच अचर बचर खाऊ नकोस, आत्ता गरम गरम करून वाढते’ असे म्हणून मला वाढणारी,आम्हाला ...

पेट्रोल दरवाढ

पेट्रोल दरवाढ!!! आता पहा, पेट्रोल ८२ चे ८६ रुपये झाले... ४ -५ रुपये प्रति लीटर वाढले.. बापरे !! ४ -५ रुपये!!! गेल्या ४-५ दिवसांत सगळ्यात जास्ती यावरचे jokes आणि posts आल्यात. खरोखर,किती जण खरोखर विचार करतात या ४ रुपयांचा??? १:दरवाढिनंतर किती जणांनी हाॅटेलचे खाणे सोडले?? १% लोकांनी पण नाही. कारण Pizza Hut, dominos मध्ये जाउन एका ८’८” च्या pizza ला ५००-६०० मोजताना आम्ही सामान्य नसतो. ५०० च्या ऐवजी pizza 550 चा झाला तरी आम्हाला फार फरक पडत नाही. २:किती जणांनी ४-५ रुपये वाचवायचे म्हणून १-२ किमी अंतरावर पायी जाणे चालू केले?( Fittness साठी जे चालतात त्यांचे नाही म्हणत मी) हाताच्या बोटावर मोजण्याईतकी पण माणसे निघणार नाहीत. ३: किती जणांनी हे ४-५ रूपये वाचवायचे म्हणून आपले weekend plans रद्द केले?? ४: किती जणांनी आपल्या घरी मुलांचे (केवळ ४-५ रूपये वाचवायचे म्हणून)मॅंगो ice cream cancel केले? ५: किती जणांनी theatre मध्ये जाउन टुकार चित्रपट बघणे cancel केले?? अशी खुप मोठ्ठी यादी करता येईल, खरच मनापासून कोणी हा विचार केला की दरवाढ का होत आहे.माझा काही फार अभ्यास नाही या विषयावर आ...

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा आजही न चुकतां आठवते ती माझ्या लहानपणीची वटपौर्णिमा! आमच्याइथल्या पटेलांच्या वाड्यात असलेल्या वडाला पूजायला सगळ्या गृहिणी नटून थटून यायच्या.आई आणि आजीबरोबर मीसुद्धा छान आवरुन, गजरे घालून( गजरा पिनेने केसात लावून तो कपाळावर रूळत ठेवण्याची ती fashion अनेकींना आठवत असेल)हातात फुले किंवा पाण्याचा तांब्या घेउन जायचे. सगळ्याजणी मनोभावे पूजा करायच्या. हे असेच का? तसेच का? आम्हीच का करायचा उपवास? नवरेमंडळींनी का नाही? सात जन्म कोणी पाहिलेत वगैरे वगैरे विचार नसायचेच तिथे. असायची फक्त श्रद्धा(अंधश्रद्धा नव्हे)! कारण तेव्हा आपल्या आई-आजी फक्त नवराच मागत नसाव्यात बहुदा. पूजा करताना नवरेमंडळींबरोबरच सासर-माहेरची तीच माणसे त्यांच्या नजरेसमोर असावीत.ह्यातली सर्वच त्यांना जपणारी, समजून घेणारी होतीच असे नाही. पण ती त्यांची आपली माणसे होती.त्यांनी तिला आणि तिने त्यांना जसे आहे तसे स्वीकारले होते. म्हणूनच पूजा करताना एक मंगल वातावरण असायचे. शास्त्रार्थ , सायन्स वगैरे बाबी गौण होत्या त्यांच्याकरता. कदाचित त्यामुळेच नाती घट्ट होती, त्याची वीण मजबूत होती. वेळप्रसंगाला धावून येणारे अनेक...

त्रिवेणी

# late post त्रिवेणी..... काही दिवस खास असतात, आवर्जुन आपण celebrate पण करतो. पण असेही कधी होते की एखादी घटना, एखादा दिवस काळाच्या ओघात विस्मृतीत जातो.आणि एक दिवस अचानक वीज चमकावी तश्या त्या स्मृती चाळवतात. आज १२ जुलै ... बरोबर ४० वर्षांपूर्वी आम्हा कुलकर्णींच्या घरात एक छोटेखानी समारंभ पार पडला होता.आमच्या ‘त्रिवेणी’ बंगल्याची वास्तुशांत... एखाद्या गोष्टीशी आपली नाळ जुळते म्हणतात ना तसं झालं असावं माझ्याबाबतीत. अरविंद अन् अर्चनाने नवीन घरात आज शुभारंभ केला होता अन् त्यांच्याही नकळत त्यांच्या आयुष्यात एका छोट्या जीवाचे आगमन होऊ घातले होते, एक छोटासा अंकुर अर्चनाच्या उदरात स्थानापन्न होत होता...... ते म्हणजे साक्षात अस्मादिक😀 तेव्हापासून त्रिवेणी बंगला आणि मी.. आमचे कधीही न तुटणारे नाते जुळले... या घराने तब्बल १२ वर्षे अनघाचे सर्व टप्पे पाहिले. छोट्याश्या अनघाचे स्वागत त्याने केले, तिला अक्षरश: अंगाखांद्यावर खेळविले. त्या घराचा प्रत्येक कानाकोपरा पराग, अनघा आणि जानुच्या मनांत आजही घर करुन आहे. ते छोटेसे लाकडी फाटक.. हिरव्या रंगाचे, त्यांवर उभे राहून आत यायचे हा शिरस्ता. फ...

कण्हा

कण्हा (कविवर्य कुसुमग्रजांची क्षमा मागून) ओळखलंत का सर मला लोकसभेत म्हटला कोणी माहीत होते त्यालाही की आता (आपल्याच)तोंडचे पळणार पाणी तासभर बसला, नंतर उठला बोलला लिखित स्पीच पाहून म्हणे गारद करेन तुम्हाला माझे टिकास्त्र सोडून संधी मिळताच त्याची जीभ नाच नाच नाचली पण हाय! आयत्यावेळी बाहेरच्या बार मध्ये घसरली काॅंग्रेसवासींना घेउन मी आता  करणार काय (२०१९ हरल्यावर)क्लासेस डोळे मिचकवण्याचे  मी नक्की काढणार हाय उद्देश एकच होता माझा, तो ही होता भला, कैक दिसांनी जनतेला, विनोदी कार्यक्रम दिला मोडून पडलाय पक्ष आणि मोडला आमचा कणा असे म्हणत बिलगला, म्हणाला (निदान) तुम्ही आपले म्हणा ! @अनघा पारखी

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...

मी, चाळीशी, crush आणि तो!

मी, चाळीशी, crush आणि तो!!!!! नवरोबा मुलींना आणायला गेला अन् मी तिथेच थांबले. त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा... कसा भेटणार हा आपल्याला??? अखेर नंबर लागला.. पण तो एकदम म्हणाला,”sorry! It’s enough!” माझा पवित्रा एकदम गयावया करण्याच्या स्थितीत! मग त्या गयावयांनी त्याला बहुदा ‘दया’ आली अन् मला स्वाक्षरी मिळाली. मग माझ्या त्याला सुचना, म्हणजे माझे नाव लिहून सही कर वगैरे! तोहि हसला, तसा फार हसत नाही तो पण आता हसला! गप्पा मारायला लागला. विषय असे काही खास नव्हते पण तेव्हा कुठे लक्षात आले की आसपास एकही चाहता नव्हता, गप्पा फक्त आम्ही दोघेच मारत होतो. त्याला सांगितले मी की तुझ्याबरोबर at least एक कप काॅफी प्यायची आणि मनसोक्त गप्पा मारायच्या आणि त्यासुद्धा मराठीत!हे स्वप्न होतं माझे...तो हसला अन् cafeteria मधून चक्क २ काॅफी order केल्या. काॅफी झाल्यावर चक्क Selfie पण काढले.हे फोटो लगेच Facebook, whatsapp वर टाकायचे असा विचार आला मनात! तेवढ्यात मुली आल्या अन् मी त्यांचा आवाज ऐकून भानावर आले,त्या ज्या दिशेने येताहेत त्या दिशेने पाहिले तर चक्क उजाडले होते,मोबाईलचा आवाज खणखणत होता. “आज ...

शिक्षक दिवस

शिक्षक दिवस शिक्षकी पेशा हा तसा आमच्या घरचाच! माझे आजोबा म्हणजे आमचे दादा (कै. भगवान विष्णू कुलकर्णी) लोणावळ्यातील नावाजलेले गणित आणि इंग्लिशचे शिक्षक. त्यांची शिकविण्याची पद्धतच फार छान होती. मला आठवतंय की गणिताचे पुस्तकदेखील ते वाचायला सांगायचे. एखादा chapter समजून घेताना त्याची theory समजणे अतिशय आवश्यक! पुस्तकात सोडवून दिलेल्या पद्धतीने गणित सोडवून झाल्यावर त्याच्या अजून किमान २ पद्धती ते शिकवायचे, आपले उत्तर पडताळून कसे पहायचे हे देखील सांगायचे. एकदा का हि पद्धत डोक्यांत बसली की तुम्ही मुद्दाम चुकायचे ठरवले तरीही चुकणार नाही. इंग्लिशचे देखील तसेच! नवीन धडा असेल की आधी तो वाचायचा किमान ३ वेळा, अवघड आणि न समजलेले शब्द वहीत लिहायचे. मग दादा त्या शब्दांचा अर्थ तर सांगायचेच पण तो शब्द म्हणजे काय? Noun, pronoun, verb etc. त्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ  काय, विशेषण काय, तिसरे रूप काय होते, वाक्यात कसे वापरायचे! ह्या सर्व गोष्टींची मग उजळणी असे. दादांची शिकवणी अजूनही अनेकांना आठवत असेल.बरे, आजच्यासारखी फि ची काळजी नव्हतीच त्यांना. फि तर अगदी नाममात्र अन् ती देखील कित्येकांची वर्षावर...

तुला पाहता पाहता कट्यार काळजात घुसली

तुला पाहता पाहता कट्यार काळजात घुसली! जुई, माझी मुलगी, वयं वर्षे १०,सध्या अभिनेत्री बनायचे कि गायिका बनायचे या संभ्रमात आहे.रोज १०० वेळा तिला हा प्रश्न पडतो. कालचाच प्रसंग::::: जुई: आई, आज माझ्या स्वप्नात महेश काळे आला होता. पण तो थोडा म्हातारा झालेला होता. मी: हो का? जुई: अगं हो! कारण मी young होते ना! ( ह्या dialogue ला डोळ्यांत चमक) मी: बरं बरं !मग? जुई:मग काय !तो पिक्चर काढत होता मला घेऊन! मी (मनांत): इंजिनीअर via गायक ते Director!  Good Going महेश काळे!! मी (जुईला): अरे व्वा! Heroine का आपण?छानच की! जुई: नाही! म्हणजे ते हिरो cum व्हिलन असतात ना तसं! तशी मी Heroine cum व्हिलन म्हणजे vamp का काय ते. आणि गाणे पण गाणार होते. आई: अरे देवा! मग हिरो नाही वाटतं तुमच्या पिक्चर मध्ये??? जुई: होता ना! मी: कोण? जुई: *”सुबोध भावे”* मी ( मनात) भाव्यांच्या सुबोधला उद्देशून: लोकमान्या, बालगंधर्वा तुमच्या प्रसिद्धिचे पुष्पक विमान “सनई चौघडे” वाजवत वाजवत फार सुसाट धावतंय. “तुला पहायला “ सुरुवात केली आमच्या पिढीने अन् ती “ कट्यार” आमच्या नंतरच्या generation च्या “काळजात घुसल...

माझा गणपती बाप्पा

गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया आज दणाणून गेलाय साराच परिसर या गर्जनेने. ढोल, ताशांच्या गजराने आसमंत व्यापून टाकलंय. घरांघरांतील बाप्पा, सार्वजनिक मंडळातील श्रींच्या मुर्ती.. नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त बाप्पा! हा बाप्पा मला नेहमीच फार वेगवेगळ्या रुपांत दिसलाय. ‘लोणावळ्याचा आमच्या घरचा बाप्पा’ मला माझ्या मोठ्या भावासारखा वाटतो, जो माझ्यावर माया करतो, माझे लाड करतो. मी चुकले तर दटावतोही.कधी कधी आम्ही भांडलोसुद्धा आहोत. पण तरीही तो अन् मी फार लाडके आहोत एकमेकांचे. नारायण पेठेतला, माझ्या सासरचा बाप्पा मात्र एकदम वडिलधारी माणूस वाटतो मला.त्याच्याविषयी प्रेम तर आहेच खुप पण त्याच बरोबरीने थोडा आदरयुक्त धाकदेखील आहे.कदाचित कधीकधी मी मनमोकळेपणानं बोलायला धजत नाही पण आश्चर्य म्हणजे त्याला माझ्या मनातले सगळं समजतं. भांगरवाडी गणपती मंदिर उत्सवाचा बाप्पा म्हणजे माझा जिवाभावाचा मित्र वाटतो मला.खुप खेळलोय आम्ही, मज्जा केलीय, गुपिते share केली आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सगळे गणपती आणायला निघालो की हमखास दर्शन घडते ते हमालवाड्यातून निघणार्‍या ‘कसबा गणपतीचे’. अनभिषिक्त राजा!...

रंगमंच आयुष्याचा

५ नोव्हेंबर ....आज मराठी रंगभूमी दिवस “बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जांहपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है। कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता। हा हा हा।" किती सहजतेने ही वाक्ये उच्चारतो तो. त्याचा मित्रही मजेत रेकाॅर्ड  करतो. दोघेही जोरजोरात हसतात.... तो क्षण enjoy करतात. तीच रेकाॅर्ड तो गेल्यावर परत लागते, जेव्हा त्याचा मित्र कोसळलेला असतो त्याच्या जाण्याने.क्षणभर तो मित्रच काय पण आपणही दचकतो! तो सीन अंगावर शहारे आणतो.तीच वाक्ये पण परिस्थिती अगदी उलट. हा जगाचा रंगमंच खरोखर अजब आहे नाही! नाटक लिहीलेलं तर असतं पण तालमी होत नाहीत. भूमिका ठरलेली असते पण कलाकाराला माहीतच नसतं की आपल्या भूमिकेची लांबी किती, रुंदी किती! Entry घेतली जाते, कला सादर व्हायला लागते अन् अचानक कधी तरी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, तो आवाज कानात घुमत असतानाच अचानक होतो Black out! थोड्याच काळाकरता पण पूर्ण सीन बदलून टाकणारा. कलाकाराला जमीनीवर, वास्तवात आणणारा. एखादा ती भूमिका पूर्णपणे जगतो तर कोणाला...

सामान्य व्यक्तींमधील वल्ली जगासमोर आणणारा खेळीया

सामान्य व्यक्तींमधील वल्ली जगासमोर आणणारा खेळीया (स्थळ: स्वर्गातील एक दालन,सर्वत्र सनईचे मंगलसूर ऐकू येत आहेत..देव गंधर्व आणि अप्सरादी मंडळी सुरेख शृंगार करून, उंची अत्तर लावून तयार होत आहेत. तेवढ्यात एक छोट्या चणीचे, तब्येतीने किरकोळ, डोळ्यांमध्ये निळसर झाक,डोक्यास टक्कल असे आजोबा थोड्या घाईतच येताना दिसतात) अंतू बर्वा: ( अनुनासिक स्वर) अरे शिंच्या! नारायणा ! कुठे उलथला आहेस रे! सकाळी लवकर येणार होतास ना रे ? अरे नारोबा.... नारायण: ( आत कोणालातरी उद्देशून)ते साडीचे पाहतो मी.. पेशवाईमध्येच आॅर्डर दिलीय...अहो म्हणजे काय? भाईंची अर्धांगिनीचा मान नको का त्यांना! (अंतूंना पाहून) अहो तुमच्याकडेच यायला निघालो होतो. अं.ब: तू कसला येतोस वेळेत..१०० कामे एकट्याच्या उरावर घ्यायला सांगितलन् कुणी?द्यायचे एखादे काम इतरांना! क्काय?तो गटण्या कुठे उलथलाय? की बापाप्रमाणे प्रुफं तपासत बसलाय? बरं बोलावणी गेली ना प्रत्येकाला?सूत्र संचालनाचं कोण बघतंय आणि? नारायण: अहो,चितळे मास्तर! म्हणाले, “ज्याला हातात लेखणी धरायला शिकवले,त्याने त्याच लेखणीने अजरामर केले मला. मग त्याच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आ...

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...