Skip to main content

Posts

Showing posts from December, 2018

किरण

इयत्ता तिसरी, कडू सरांच्या आॅफिस समोरचा वर्ग. माझी आणि मयुराची ठरलेली जागा, सेकंड लाईन मधला पहिला बेंच. आमच्या आधी आलेल्या मुली पण त्याजागी बसणार नाहीत इतपत आमची दादागिरी. पण त्यादिवशी काही वेगळंच घडलं, आम्ही वर्गात आलो तर तिथे माझ्या जागेवर कोणीतरी अनोळखी ,नवीन मुलगी बसलेली. मी: ए उठ! हि आमची जागा आहे. ती: मी नाही उठणार , मी पहिले आल्येय. थोडावेळ आमची धुसफुस झाली पण ती तिथेच बसली. बाई वर्गात आल्या, आम्हाला तिघींना एका बेंचवर पाहून न पाहिल्यासारखंच केलं. तिने दप्तर पाठीशी ठेवले होते. तिचे लक्ष नाही असे पाहून मी ते जमीनीवर पाडले, ती ते घेण्यासाठी वाकली अन् मी,तिला बाजूला ढकलून दिले अन् बेंचवर तिला जागाच ठेवली नाही. तिने रडवेल्या चेहर्याने बाईंकडे पाहिले, बाई मला रागावल्या पण मग तिला वेगळीकडे जागाही करून दिली.( मी अन् मयुरा, आम्ही बाईंची तशी लाडावलेली बाळं होतो) ही माझी आणि ‘किरण’ची पहिली भेट. हळूहळू आम्ही सगळेच तो प्रसंग विसरलो अन् मैत्रीणी झालो. मार्कांच्या चढाओढीत मी, मयुरा अन् आता किरणचाही समावेश झाला. एकीकडे आमच्यात पहिल्या नंबराची चुरस होती तर एकीकडे आम्ही अन् आमचा कंप...