Skip to main content

मी, चाळीशी, crush आणि तो!

मी, चाळीशी, crush आणि तो!!!!!

नवरोबा मुलींना आणायला गेला अन् मी तिथेच थांबले.
त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा... कसा भेटणार हा आपल्याला???
अखेर नंबर लागला.. पण तो एकदम म्हणाला,”sorry! It’s enough!”
माझा पवित्रा एकदम गयावया करण्याच्या स्थितीत! मग त्या गयावयांनी त्याला बहुदा ‘दया’ आली अन् मला स्वाक्षरी मिळाली.
मग माझ्या त्याला सुचना, म्हणजे माझे नाव लिहून सही कर वगैरे! तोहि हसला, तसा फार हसत नाही तो पण आता हसला! गप्पा मारायला लागला. विषय असे काही खास नव्हते पण तेव्हा कुठे लक्षात आले की आसपास एकही चाहता नव्हता, गप्पा फक्त आम्ही दोघेच मारत होतो.

त्याला सांगितले मी की तुझ्याबरोबर at least एक कप काॅफी प्यायची आणि मनसोक्त गप्पा मारायच्या आणि त्यासुद्धा मराठीत!हे स्वप्न होतं माझे...तो हसला अन् cafeteria मधून चक्क २ काॅफी order केल्या.

काॅफी झाल्यावर चक्क Selfie पण काढले.हे फोटो लगेच Facebook, whatsapp वर टाकायचे असा विचार आला मनात!
तेवढ्यात मुली आल्या अन् मी त्यांचा आवाज ऐकून भानावर आले,त्या ज्या दिशेने येताहेत त्या दिशेने पाहिले तर चक्क उजाडले होते,मोबाईलचा आवाज खणखणत होता.

“आज बाईसाहेब खुशीत एकदम! क्या बात है! सकाळी सकाळी नो आरडाओरड अन् मुखकमलावर झक्कास्स smile 😊! अरे व्वा!” इति नवरोबा

मी फक्त हसले अन् मनात म्हणाले,” राहुल द्रविड,बस्स! इतनासा ख्वाब है!”

आणि नवरोबांच्या हातात चहा देऊन मनसोक्त गप्पा मारल्या!!!!

@ अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...