शिक्षक दिवस
शिक्षकी पेशा हा तसा आमच्या घरचाच! माझे आजोबा म्हणजे आमचे दादा (कै. भगवान विष्णू कुलकर्णी) लोणावळ्यातील नावाजलेले गणित आणि इंग्लिशचे शिक्षक. त्यांची शिकविण्याची पद्धतच फार छान होती. मला आठवतंय की गणिताचे पुस्तकदेखील ते वाचायला सांगायचे. एखादा chapter समजून घेताना त्याची theory समजणे अतिशय आवश्यक! पुस्तकात सोडवून दिलेल्या पद्धतीने गणित सोडवून झाल्यावर त्याच्या अजून किमान २ पद्धती ते शिकवायचे, आपले उत्तर पडताळून कसे पहायचे हे देखील सांगायचे. एकदा का हि पद्धत डोक्यांत बसली की तुम्ही मुद्दाम चुकायचे ठरवले तरीही चुकणार नाही. इंग्लिशचे देखील तसेच! नवीन धडा असेल की आधी तो वाचायचा किमान ३ वेळा, अवघड आणि न समजलेले शब्द वहीत लिहायचे. मग दादा त्या शब्दांचा अर्थ तर सांगायचेच पण तो शब्द म्हणजे काय? Noun, pronoun, verb etc. त्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ काय, विशेषण काय, तिसरे रूप काय होते, वाक्यात कसे वापरायचे! ह्या सर्व गोष्टींची मग उजळणी असे.
दादांची शिकवणी अजूनही अनेकांना आठवत असेल.बरे, आजच्यासारखी फि ची काळजी नव्हतीच त्यांना. फि तर अगदी नाममात्र अन् ती देखील कित्येकांची वर्षावर्षाची बाकी असायची.
दादांच्या अखेरच्या दिवसात भ्रमांतदेखील ते गणिते सोडवून सांगायचे, तर्खडकर शिकवायचे, बहुदा तेथील 👆मुलांची Online बॅच त्यांनी सुरू केली असावी
बेंद्रे बाई,माझ्या प्राथमिकच्या बाई! स्वभावत:च प्रेमळ. त्या फार कधी कोणाला ओरडल्याचे मला आठवतच नाही. प्रत्येक विषय अगदी हळुवार, रंगतदार करून शिकवण्याची त्यांची हातोटी.माझ्यावर तर विशेष जीव होता त्यांचा.सई जुईंना भेटल्यावर ,तितक्याच प्रेमाने,” मी तुमच्या आईची teacher बरं का!आईसारखे व्हा!”असा आशीर्वाद त्या नेहमी द्यायच्या.
त्या आजारी असताना कामामुळे माझे भेटणे होत नव्हते, मात्र एकदा काहीही करून भेटायला गेले त्यांना. बाईंना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यांत दिसत होता. आशीर्वाद देताना डोळे भरून आले त्यांचे, कदाचित त्यांना माहित होते की हा आपण दिलेला शेवटचा आशीर्वाद !
बेंद्रे बाईंनंतर जर माझ्यावर कोणी मुली सारखे प्रेम केले असेल तर ते पाटेकर बाईंनी! त्यांच्या घरचा scholarship चा क्लास हा विसरणेच शक्य नाही.
पाटील सर! आमच्या शाळेचे मुख्याध्यापक! आमच्या शाळेची जी काही शान होती , ती केवळ सरांमुळेच! “Pin drop silence “ म्हणजे काय हे जर पहायचे असेल तर सरांचा तास पहावा.
मला आठवतंय कि मी ‘छात्रसमिती अध्यक्ष’ होते. 5 सप्टेंबर चा कार्यक्रम सुरू होता. केवळ आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी stage वर होतो. Stage च्या मागे भाषण करणारे विद्यार्थी उभे होते. अचानक भाषण करणारा एक विद्यार्थी भाषण विसरला,त्याची चिठ्ठि त्याच्याजवळ नव्हती. तो आठवू लागला. हे पाहून काही व्रात्य मुले हसू लागली,त्याला चिडवू लागली.मी ऊठून माईकपाशी गेले, म्हटले, काही कारणास्तव xxxहा विद्यार्थी भाषण करू शकणार नाहीये त्यामुळे त्याचे उर्वरीत भाषण xxx (समोर बसून चिडवणारा विद्यार्थी) करेल.तो मुलगा घाबरला अन् sorry म्हटला. त्या कार्यक्रमानंतर पाटिल सरांनी मला बोलावून माझी पाठ थोपटली.त्यावेळी माझ्याविषयी फार मोठा विश्वास त्यांच्या डोळ्यात दिसला होता.
१० वी मध्ये लोणावळ्यांत प्रथम आल्याचा सरांइतका आनंद मलादेखील झाला नव्हता.
मुकुंद काका, ( खिरे सर) ... तसे तर पप्पांचे मित्र!१० वी त सकाळच्या क्लासला मला मात्र इतरांपेक्षा अर्धा तास आधी जावे लागे! D type ची गणिते सोडवायला. सरांचे “ There is always room at the top!” हे वाक्य मला आजतागायत स्मरते.गणित,इंग्लिश,सायन्स बरोबरच भाषा विषय जिंकून घे हि त्यांची शिकवण मला आजतागायत साथ करत्येय.आजही मी लिहीलेल्या प्रत्येक लेखाला सरांची शाबासकी मिळतेच!
चौधरी सर,विद्धंस सर, भट बाई , बागदरे सर,वसुधा पाटिल बाई यांनी वेळोवेळी मला,माझ्यातल्या कलाकाराला उत्तेजन दिले.
आयुष्यात आतापर्यंत वेळोवेळी खुप चांगले शिक्षक,गुरू लाभले.त्या प्रत्येकाकडून पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडचे शिकायला मिळाले.ती पुंजी आज पुढे पुढे वाटचाल करताना कामास येत आहे.त्या माझ्या सर्व शिक्षकांना माझे अभिवादन🙏🙏
@अनघा पारखी

Comments
Post a Comment