Skip to main content

रंगमंच आयुष्याचा

५ नोव्हेंबर ....आज मराठी रंगभूमी दिवस

“बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जांहपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है। कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता। हा हा हा।"

किती सहजतेने ही वाक्ये उच्चारतो तो. त्याचा मित्रही मजेत रेकाॅर्ड  करतो.
दोघेही जोरजोरात हसतात.... तो क्षण enjoy करतात.

तीच रेकाॅर्ड तो गेल्यावर परत लागते, जेव्हा त्याचा मित्र कोसळलेला असतो त्याच्या जाण्याने.क्षणभर तो मित्रच काय पण आपणही दचकतो! तो सीन अंगावर शहारे आणतो.तीच वाक्ये पण परिस्थिती अगदी उलट.

हा जगाचा रंगमंच खरोखर अजब आहे नाही!
नाटक लिहीलेलं तर असतं पण तालमी होत नाहीत.
भूमिका ठरलेली असते पण कलाकाराला माहीतच नसतं की आपल्या भूमिकेची लांबी किती, रुंदी किती!

Entry घेतली जाते, कला सादर व्हायला लागते अन् अचानक कधी तरी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, तो आवाज कानात घुमत असतानाच अचानक होतो Black out! थोड्याच काळाकरता पण पूर्ण सीन बदलून टाकणारा. कलाकाराला जमीनीवर, वास्तवात आणणारा.

एखादा ती भूमिका पूर्णपणे जगतो तर कोणाला सतत प्राॅम्प्टरचा आधार लागतो.

कधी कोणाच्या नाटकाचा शतक महोत्सव तर कधी कोणाचे नाटक ३-४ प्रयोगात बंद.

कधी टुकार नाटक पण भन्नाट चालते तर कधी आशयघन नाटकाची हार होते.

कधी कोणी भूमिका तन्मयतेने करत राहतो तर कधी कोणी उन्मत्त होतो, ते नाटक, ती नशा चिरकाल असणार आहे या भ्रमात.

कधी कोणी हसवतो, हसतां हसता रडवतो. कधी कोणी उगाचाच आढ्यतेचे bearing घेउन पूर्णवेळ आकसून बसतो.

ते नाटक साजरे करायला जसा तो कलाकार महत्वाचा त्याचप्रमाणे त्याचे सहकलाकार, परिस्थितीनामक तांत्रिक बाबी सांभाळणारे back stage कलाकार,त्या नाटकांत रंग भरणारे निसर्गाचे,सणसमारंभांचे, सुखद दु:खद प्रसंगांचे संगीत अन् प्रकाशआणि या सर्वांना आपल्या तालावर नाचवणारा तो खेळीया!

फार कमी जण असतात की जे ह्या रंगमंचावर शतकानुशतके टिकेल असा ठसा उमटवून जातात, त्यांच्यासाठीच्या टाळ्यांचे अन् वाहवांचे आवाज कायम त्या रंगमंचावर गुंजत राहतात.

@अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...