Skip to main content

तो आणि मी

तो आला...त्याने पाहिले.. त्याने जिंकले! अगदी असेच काहीसे झाले त्याचे अन् माझे.
Arrange Marriage असून सुद्धा!
सगळंच काही छान छान .. Goody Goody नव्हतं. सगळ्या नवरा- बायकोंसारखे आमचेही ‘ बोलणे कमी अन् टोमणेच जास्त’.अगदी रोजच्या रोज!
मी ‘एक’ म्हटले की त्याने ‘दोन’ म्हंटलेच पाहिजे आणि त्याने ‘एक’ म्हटले की मी ‘दोन’.
होते मात्र अनेकदा माझ्याच मनासारखे. अर्थात त्यालाही ते तसेच व्हावेसे वाटत असते.पण माझ्याशी वादविवाद घालून, मग माझे चिडणे..रूसणे..रडणे आणि मग त्याने हार मानल्यासारखे करुन मला समजावणे!!
आम्ही स्वभावाने म्हणाल तर अगदी दोन टोकं!
माझी सतत बडबड आणि हा मुलखाचा शांत,
मी नाही पटले तर तोंडावर बोलणार अन् हा कोणतीच गोष्ट ओठांवर नाही आणणार,
जेवणाची वेळ ५ मिनिटे जरी इकडे तिकडे झाली की ह्याची तगमग सुरु होणार अन् मला मात्र सगळ्या वेळा झुगारून द्यायलाच आवडणार,
त्याला आवडणार पोळी भाजी अन् मला चटकदार चाट, चायनीज, spicy पदार्थांची मेजवानी,
मी कित्येकवेळा देखाव्याला भुलणार अन् हा मात्र प्रत्येकवेळी तासून Quality पहाणार,
मी अनेकदा, अनेकांकडून अपेक्षा करणार, अन् पूर्ण न झाल्यास चिडचिड करणार,
आणि हा मात्र स्वत: चांगलेच वागणार आणि कोणाकडूनच अगदी माझ्याकडून देखील कोणतीच अपेक्षा नाही करणार,
घड्याळ्याच्या काट्याकडे न बघतां मला तासन् तास गप्पा मारायला आवडणार,
आणि हा मात्र मी बोलत असताना निदान १०० वेळा जांभया देणार अन् मग माझा पारा नको इतका चढणार,
पण.....
पण इतके सगळे असुनदेखील एकमेकांच्या गोष्टी न सांगतां समजणार,
आवाजातला छोटासा बदल फोनवर देखील जाणवणार,
एकमेकांपासून लांब रहात असताना ‘आठवण येते का?’ असे विचारल्यावर ‘त्यासाठी आधी विसरावे लागते’ असे Romantic उत्तर मिळणार,
एकमेकांचा निरोप घेत असताना त्याच्या डोळ्यांत पाणी तरळणार अन् कोणालाही न कळता गुरुत्वाकर्षणाचा नियम न पाळता ते विरुद्ध दिशेने जावून डोळ्यांत लुप्त होणार!
ह्याला कधी घ्यायचे माहीतच नाही, हा केवळ सगळ्यांना देणार, कोणत्याच गोष्टीला हा ‘नाही’ नाही म्हणणार!
त्यामुळे असेल कदाचित आजकाल मला काही मागायलाच आवडत नाही कारण आधी ‘नाही’ म्हणून हट्ट करण्याची संधीच मला नाही मिळणार,

गेली १२ वर्षे खुप मनमोकळे जगत आल्येय मी! ‘मोकळा श्वास’ घेत आल्येय.
तुझ्या ह्याच स्वभावाने संदीप, तु दोन्ही घरी सगळ्यांचा लाडका आहेस.
मुलींचा तर काय Dearest Dearest ‘बाबा’ आहेस.

पण एक सांगू, आयुष्याच्या ह्या अभ्यासक्रमात मी फारच कच्ची आहे, त्यामुळे अजुन निदान १०० वर्षे लागतील मला तुझ्याइतके समजुतदार व्हायला! आणि त्यासाठी तुलाच patience ठेवावा लागेल.तुलाच ती भक्कम साथ द्यावी लागेल.तरच मी हि परीक्षा उत्तीर्ण होईल ना!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदीप!!!

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...