आज ७ एप्रिल २०१८.
बालशिक्षणचे प्राथमिकचे चौथीचे विद्यार्थी आणि पालक ‘CID’( Children’s Independence Day) आणि PID ( Parents Independence Day especially सर्व आयांचा!) साजरा करतोय.
परिक्षा संपल्याचे सुख आहेच पण त्याच बरोबर आज अचानक जाणीव झाली की अरेच्चा ! संपली की Primary! तब्बल ८-९ वर्षे मुले शाळेत जात आहेत.शाळेत सोडताना आम्हाला घट्ट धरून रडणारी आमची चिमुकली आज म्हणते की आमचा friends चा plan ठरलाय आई! Please आम्हाला आता enjoy करू दे. तु नको disturb करूस किंवा तु please आता नाही म्हणू नकोस.
लहान असताना शाळा सुटली की teacher च्या खांद्यावर झोपलेल्या आमच्या मुलांना आम्ही कित्येकवेळा घेतलय. ज्या निरागसतेने मुले आपल्या teachers वर विश्वास ठेवायची त्याच निरागसतेने यापुढे ठेवतील??
शिक्षक वाक्य प्रमाणम्! Teacher सांगतील ते आणि तसेच बोलायचे, लिहायचे. अगदी १% सुद्धा बदल करायचा नाही. एखादि घटना, बातमी जर आई-बाबंपेक्षा teachers नी सांगितली असेल तर ती पटणार... आपल्याला परत परत घोळवून सांगणार.
आम्ही कितीही सांगितले तरी जोवर teachers त्यांवर शिक्कामोर्तब करत नाहीत तोवर regular dry fruits देखील हे कधी खाणार नाहीत.
माझ्या तर जुळ्या पण वेगवेगळ्या divisions मध्ये असल्याने माझ्या teacher vs तुझ्या teacher अशी रंगलेली जुगलबंदी मी अनेकदा अनुभवलीय.
हे सगळं आठवताना भरून येतय आणि त्याच बरोबर एक जाणवतंय कि आता थोडंसं mature बनावे लागेल मुलांना! कित्येक वेळा स्वत:च स्वत:ला सांभाळावे लागेल. असेच प्रेम करणारे शिक्षक यापुढे पण मिळतील पण आपली पाटी कोरी करून त्यांना स्वीकारावे लागेल.
बाहेरचे जग खुणावतय मुलांना पण आता कडेवर घेवून ते कोणी दाखविणार नाही पण नवीन शिक्षकांच्या मागे उभे राहून, थोडे ‘between the lines ‘ समजावून घेऊन पुढे जावे लागणार आहे.
मुलांनो, तुम्हा सर्वांना माध्यमिक शिक्षणाच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा !!!!

Comments
Post a Comment