Skip to main content

Mother’s Day!

Mother’s Day

आज सकाळी उठल्यापासून मोबाईल महाराज खणखणू लागले.
सर्वदूरुन एकच मेसेज.
‘Happy Mother’s Day’
अरेच्चा! हो की!
मग एक आई असल्याने मलाही फार Great वगैरे असल्यासारखे वाटायला लागले.

मी पण मग जगरहाटीला धरून WhatsApp चा DP बदलला... म्हटलं आपल्याला काहीच माहीत नसते हे फार कोणाला कळायला नको. आपणही कसे updated असतो हे कळेल इतरांना! ‘झाकली मुठ ....’

आई.... फार मोठा शब्द आहे. फ.मुंची कविता आठवली आत्ता
आई एक नाव असतं,
घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं

आई खरंच काय असते
वासराची गाय असते
लंगड्याचा पाय असते
दुधावरची साय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन् उरतही नाही

इतकं सगळं आहे आई म्हणजे... जे Mother ह्या शब्दात मावत नाही.. ती जे काही करते , ते असं शब्दात मांडताच येत नाही.
पण माझ्यासाठी माझी जन्मदात्री आई म्हणजेच सर्व का??
आजपर्यंत मला आई किती ठिकाणी भेटलीय!

माझी आई.. मला हजार कळा सोसून जन्म देणारी, मला न्हाऊ-माखु घालणारी, मला चांगल्या सवयी लावणारी, भूक लागलेली असताना ‘थांब गं! उगीच अचर बचर खाऊ नकोस, आत्ता गरम गरम करून वाढते’ असे म्हणून मला वाढणारी,आम्हाला पोटभर खाताना पाहून तृप्त होणारी,प्रसंगी चिडणारी, रागावणारी तर कधी मला पाठीशी घालणारी माझी अर्चना आई!

लहानपणापासून माझ्या हाताच्या बोटाला धरून सगंळी भांगरवाडी फिरवणारी, रोज दुपारी सोनसाखळीची गोष्ट सांगणारी, आमच्या बक्षिस समारंभाला सर्वांसाठी श्रीखंडाच्या गोळ्या आणणारी , मला भजन,किर्तन, प्रवचनाला घेऊन जाणारी अशी माझी उषा आजी!

सुट्टी लागली रे लागली की मी ठाण्याला किंवा अंधेरीला पळायचे.
मला माझ्या आवडीचा खाऊ करून देणारी, वर्षभराचे साठलेले प्रेम एकाचवेळी देऊ पहाणारी माझी तारा आजी!

आत्या,मावश्या, आज्या यांच्याइतके लाड तर खुद्द आईने पण नाही केले आणि इतकेच काय तर माझ्या हट्टी स्वभावाला सांभाळून घेउन मला समजुतीचे शब्द सांगणारी,मला काहीही मिळाल्यानंतर माझ्याइतकाच जिला आनंद होतो ती माझी धाकटी बहीण,जान्हवी, तिने देखील कित्येकदा माझ्या आईचा role केलाय.

सासू म्हटली की पहिले डोक्यावर आठ्या येतात. पण पारखींकडे आल्यावर मला सासुरवास म्हणजे काय हे कधी कळलेच नाही.कित्येकदा नी संदीपला म्हणते, बाकी कोणी नाही पण तू करतोस माझा सासूरवास!
आईंना मी आजतागायत फक्त करतानाच पाहीलंय. माझे लाड, माझे कौतुक तर खुपच.
असा एकही सण जात नाही की जेव्हा मला आईंकडून gift मिळत नाही! तक्रार करणे माहीतच नाही त्यांना.
उलट होते कित्येकदा आमच्याकडे, त्यांच्याऐवजी मीच त्यांना उपदेश करते.

ईंदु आजींची आठवण कशी होणार नाही आत्ता!! आमचे लग्न ठरताना मी पप्पांना म्हणाले होते की पप्पा, किती छान ना, त्यांच्याकडे आजी आहेत!
कित्ती गप्पा मारल्या आहेत आजींशी, दोघींनी मिळून मस्त ठेचा करायचा अन् खायचा! त्या प्रत्येक serial repeat पहायच्या अन् प्रत्येकवेळी मला नव्याने story सांगायच्या!

इतकेच नाही तर संदीपच्या काकू, आत्या, मावशी यांनीदेखील माझ्यावर खुप प्रेम केलय. आजही मी काही नवीन करत असेन तर या सर्वांकडून कौतुकाचा थाप येतेच!

आणि हे काय कमी की देवाने दोन मुली दिल्या मला! मला साधी शिंका जरी आली तरी यांचा जीव वर खाली होणार, मी कशी छान दिसेल ह्यासाठी मला tips सांगणार, माझ्या अभिनय कलेच्या तर त्या पहिल्या प्रेक्षक! उत्तम critics देखील करणार!बरं नसेल तर अगदी कुशीतसुद्धा घेणार!

ही list अशीच लांबेल, त्यात जीवाला जीव देणार्‍या मैत्रीणी आहेत, seniors आहेत, शिक्षक आहेत.

ह्या सर्वांनीच मला खुप दिलंय, देत आहेत. शुभेच्छा देऊन, फक्त DP ठेवून, Thanks म्हणून  त्याची परतफेड नाही करता येणार. आणि करायचीच नाहीये मला!

काही ऋणं आयुष्यभर जपावी, मनाच्या कुपीत साठवावीत, तसेच ठेवणार आहे मी!

अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...