प्रतिस्पर्धी अन् मित्र
..आणि डाॅ. काशिनाथ पाहिला....
एकदम कडक सिनेमा...
सुबोध भावे म्हणजे कड्क! क्या बात है!
सुबोध भावे म्हणजे कड्क! क्या बात है!
सिनेमा पाहताना घाणेकरांबरोबरच नव्याने कळली ती आणखी २ माणसे, डाॅ.लागू आणि प्रभाकरपंत पणशीकर!
आत्मविश्वास, ताकदीचा अभिनय अन् तरीही पाय जमीनीवरच. एका लहानग्या चाहतीला आपल्या प्रतिस्पर्ध्याची सही आणून देण्यासाठी प्रचंड मोठे काळीज लागते, हिंमत लागते. फार रिअॅक्ट न होता आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे अन् जिंकणे हे येर्यागबाळ्याचे काम नोहे....
प्रभाकरपंत.... तो मी नव्हेच! इतपतच माहिती ! त्यातल्या त्यात इथे ओशाळलाचा औरंगजेब थोडाफार ओळखीचा! पण आज सिनेमा पाहिला अन् त्यांच्यातला मित्र समजला.
आपल्या मित्राचा चांगला वाईट प्रत्येक गुण ओळखणारा,त्याच्यातली ताकद त्याच्यापेक्षाही अधिक माहित असलेला, त्याच्या पडत्या काळात त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा, त्यासाठी जगाशी लढणारा!
त्याच्या विक्षिप्त वागण्याला जाणून घेऊनही त्यातले चांगलेच वेचणारा! प्रसंगी त्याला खडे बोल सुनावणारा,आपल्या मित्राला अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रचंड मोठी रिस्क घेणारा! आणि इतके असुनही काशिनाथच्या यशामध्ये ‘तो मी नव्हेच!’ असे म्हणणारा हा मनस्वी कलाकार..... प्रभाकर पंत!
आणि अर्थात ह्या दोन्ही भूमिकांना न्याय देणारे आपले लाडके कलाकार... प्रसाद आणि सुमित, hats off to you too!
@अनघा पारखी
Sundar,Kahi manse ashich astat niswarthi...
ReplyDeletePart 1 एक प्रतिभावंत अभ्यासू बुद्धिमान हरहुन्नरी लाखात देखणा रॉयल टच असणारा नावीन्यपूर्ण प्रयोगशील सादरीकरणाचा ध्यास असलेला out of this world एन्ट्री असणारा नटरंग नटसम्राट ... Part 2 मनमिळाऊ मित्रांचा मित्र आणि शत्रूंचा कर्दनकाळ इतिहासप्रेमी Part 3 व्यवहार ज्ञान नसलेला उनाड बेभान बेछूट बालिश बेजबाबदार उर्मट व्यसनी रंडीबाज (पण संजुबाबा एवढा नाही) वडिलांच्या ego problem मुळे मनात ल्या मनात धुमसणारा रंगेल आणि मतलबी मित्रांचा नाद लावून घेऊन बिघडलेला Part 4 कुटुंबवत्सल प्रेम करेल तर भिल्लला सारख आणि शेवटच्या श्वासापर्येंत... ।।।।।। थोडक्यात about movie नयनरम्य अतिउत्तम सादरीकरण... कट टू कट कास्टिंग ... छान मेक अप ... उत्कृष्ट अभिनय व लोकेशन्स... एकदम कडक Tragedy ।।।।।।
ReplyDelete