शब्द आणि भाषा
सई जुई( स.जु): आई, इथे व्हॅनमध्ये सगळे मल्याऽऽलम् बोलतात, इन्द पेरन्ना...आम्हाला कळतच नाही.😏
मी: अगं मग शिका ना ती भाषा ...हळूहळू समजायला लागेल.आता ते निन्द पेरन्ना की काय ते कळते ना!
सजु: आई, ते एक गाणे पण येते आम्हाला..
“ईट्टडा पक्कड पोये....”💃🏻💃🏻
आई, आपण School मध्ये सेकंड लॅंग्वेज म्हणून अरबी घेऊयात का?? मग ती ही येईल आम्हाला.
मी: अगं पण आधी आपली मराठी-हिंदी तर नीट शिका...ती तरी कुठे बोलतां तुम्ही व्यवस्थित !
सजु: पण आई, ही भाषा कोणी तयार केली? I mean आपण महाराष्ट्रातले लोक मराठी बोलतो, गुजरात मध्ये गुजराती, केरळ मध्ये मल्लु आणि अरबी, ‘ईन्शा अल्लाह’, ‘के फलाल?’ वगैरे
मी: फार काही माहीत नाही मला, पण फार पूर्वी माणूस बोलायला लागला तेव्हा त्याच्या हावभावावरून , त्याच्या actions वरून काही शब्द तयार होत गेले.आदिमानव पूर्वी sign language मध्ये सगळे व्यवहार करायचा, मग कदाचित त्या प्रत्येक sign ला ठराविक शब्द ठरत गेले आणि हळूहळू भाषा develop होत गेली. मग एका शब्दातून दुसरा शब्द तयार होत गेला. पोथ्या पुराणेआणि इतरही अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले.
सजु: हं!!!!! (अर्धवट ऐकून दोघी आत पळाल्या)
( पाचच मिनीटांनी त्यांच्या खोलीतून जोरजोरात आवाज यायला लागला, मी पळतच तिथे गेले, तर ह्या दोघी तावातावाने भांडत होत्या.)
जुई: तू चुप् बस्स सई, वित्रट कुठची!
सई: तुच चुप्प बस!जे बोलतं तेच असतं, निथळ कुठची!
जुई: वित्रट गाढव! वेड्यासारखे वागणारी!
सई: निथळ बावळट! सगळीकडे पसारा करणारी!
मी: अगं काय चाललंय !
सई: आई, तू जा, तु आमच्या भांडणात गुंतळ घालून वाढवू नकोसच.
मी: गुंतळ?????? Anyway,सोडवा तुमचे भांडण तुम्हीच फक्त मारामारी नाही करायची( असे म्हणून या शब्दांचा अर्थ नक्की काय हा विचार करत मी बाहेर गेले)
मनात विचार आला की आज यांना या शब्दांचे अर्थ नीट नाही सांगितले तर अजून कदाचित २५-३० वर्षांनी खालील २ शब्दांना जोडल्यास तयार होणारा समानार्थी शब्द लिहा ह्या प्रश्नप्रकारांत (अर्थात मराठी third language म्हणून राहिली असली तर)
विचित्र+ वात्रट= वित्रट
निखळ+अजागळ= निथळ
गुंतणे+ गोंधळ= गुंतळ
हि ऊत्तरे लिहिली जातील.
पण मग मनांत आले भाषा अशीच तर develop झाली असेल नाही???
@ अनघा पारखी

Comments
Post a Comment