इयत्ता तिसरी, कडू सरांच्या आॅफिस समोरचा वर्ग. माझी आणि मयुराची ठरलेली जागा, सेकंड लाईन मधला पहिला बेंच. आमच्या आधी आलेल्या मुली पण त्याजागी बसणार नाहीत इतपत आमची दादागिरी.
पण त्यादिवशी काही वेगळंच घडलं, आम्ही वर्गात आलो तर तिथे माझ्या जागेवर कोणीतरी अनोळखी ,नवीन मुलगी बसलेली.
मी: ए उठ! हि आमची जागा आहे.
ती: मी नाही उठणार , मी पहिले आल्येय.
थोडावेळ आमची धुसफुस झाली पण ती तिथेच बसली.
बाई वर्गात आल्या, आम्हाला तिघींना एका बेंचवर पाहून न पाहिल्यासारखंच केलं. तिने दप्तर पाठीशी ठेवले होते. तिचे लक्ष नाही असे पाहून मी ते जमीनीवर पाडले, ती ते घेण्यासाठी वाकली अन् मी,तिला बाजूला ढकलून दिले अन् बेंचवर तिला जागाच ठेवली नाही.
तिने रडवेल्या चेहर्याने बाईंकडे पाहिले, बाई मला रागावल्या पण मग तिला वेगळीकडे जागाही करून दिली.( मी अन् मयुरा, आम्ही बाईंची तशी लाडावलेली बाळं होतो)
ही माझी आणि ‘किरण’ची पहिली भेट.
हळूहळू आम्ही सगळेच तो प्रसंग विसरलो अन् मैत्रीणी झालो. मार्कांच्या चढाओढीत मी, मयुरा अन् आता किरणचाही समावेश झाला.
एकीकडे आमच्यात पहिल्या नंबराची चुरस होती तर एकीकडे आम्ही अन् आमचा कंपू, शालेय, आंतरशालेय सांस्कृतिक अन् क्रिडा क्षेत्र गाजवत होता.
शारदोत्सव, कलापिनी नाट्यमहोत्सव, आमच्या शाळेत आयोजित नाट्यस्पर्धा, डाॅजबाॅल अन् थ्रो बाॅलची आमची टिम...हे त्यातले विशेष लक्षात ठेवण्याजोगे.
ह्या बरोबरच सायकलवरून मारलेल्या चकराआणि त्यावेळी किरणकडेच फक्त VCR होता, तिच्याकडे पाहिलेला ‘बेटा’ सिनेमा अन् तेव्हाची हसाहशी न विसरण्यासारखी.
आमच्या सगळ्यांपेक्षा तिचे घर तेव्हा खुप वेगळं होतं, एक मोठ्ठं राजस्थानी कुटुंब, त्यात राहणारी बरीचशी माणसे. इतके मोठ्ठे सधन कुटुंब पण अंकल-आंटी अगदी साधे,सगळ्यांचेच लाड करायचे.
शाळा संपली अन् आम्ही पांगलो. वाटलं दर आठवड्याने भेटूच आपण,पण नाही जमलं.
आणि अचानक बारावी झाल्यावर ती अन् मी एकाच कॅम्पसमध्ये आलो. मी ‘आयुर्वेद’ तर किरण ‘ होमियोपॅथी’ ला.
खुप छान वाटलं. रोज गप्पा मारायला जरी भेटत नसलो तरी एकमेकींची खबर असायची.
एकदा माझ्या वाढदिवसाला “Happy Birthday Rani” असं मोठ्ठ्या अक्षरात फळ्यावर लिहिले तिने, खाली from: किरण
क्लासमधले अनेक जण हा किरण नावाचा मुलगा कोण याचा विचार करत राहिले. (अर्थात तुझ्याशी बोलून मी ‘किरण’ म्हणजे तूच हे कन्फर्म केले)
बिनधास्त, बडबडा अन् हसरा स्वभाव ही तिची ओळख.
इंटर्नशिपला असताना अचानक तिने लग्न ठरल्याचे सांगितले. खुप आनंदात होती ती.
काॅलेज संपल्यावर खंड पडला भेटण्यात पण एकमेकींची ख्याली- खुशाली कळत होती, कधीतरी भेट घडत होती.
पण अचानक ती निघून गेली आम्हा सगळ्यांमधून, परत कधीही न येण्याकरता.
पण किरण, खरं सांगू,आजपर्यंत एकही असा ४ डिसेंबर गेला नाही, जेव्हा मला तुझी आठवण आली नाही.अजुनही वाटतं की तू कुठून तरी येशील अन् गर्दीतही कोणाचीच पर्वा न करता “राऽऽऽऽऽऽऽणी” अशी जोरात हाक मारशील,खुप बडबड करशील, मोठमोठ्यांदा हसशील.गप्पा मारशील.
किरण,एकदा तू वर्गातल्या फळ्यावर लिहून मला wish केले होतेस, आज मी ह्या social media च्या फळ्यावर तुला wish करते,
“Happy Birthday Kiran! I miss you a lot.”
तुझी,
राणी
@ अनघा पारखी

Comments
Post a Comment